टॅक्स भावनांचे

 टॅक्स  भावनांचे .

  एका खूप बिझी दिवसातले काही वेटिंग पेरियड ,

  सर्कशीतल्या विदूषकाचं पोट भरुन हसवणं आणि अचानक डोळयात अश्रू आणणं ,

   एका परफेक्ट डाएट मधील मस्त चॉकलेट आईस्क्रीम ,

    मन भरून गप्पा मारताना आलेले अव्यक्त पॉझ ,

   मोठेपणात जगाताना त्या लाघवी बालपणाला मिस करणं ,

  रोटी भाजी खाताना आठवणारी चुलीवरच्या पिठलं भाकरीची चव ..

  फर्निश्ड थ्री बीएचकेतल्या स्पेसिअस गैलरीत बसूनही आठवणारे ते अंगणातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पत्त्यांचे डाव आणि गाण्याच्या भेंडया....

मस्त दिलखेचक पेंटिंग मधली चुकून रंगवायची राहिलेली सावलीची शेड ,

   हे टॅक्स भरावेच लागतात ..... 

  पुन्हा एकदा नविन  अनुभवांचं इनकम वाढवण्यासाठी ..🙏

   

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट