जागतिक रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 सांग तूझा *रंग* कोणता ?

साज चेहऱ्यावर लावून अभिनयरंग बेफाम उधळणाऱ्या *अभिनेता / अभिनेतीचा* ? की ,

त्याच रंगावर आरूढ होऊन साधलेल्या त्या डोळे दिपवणाऱ्या *स्पॉटचा* ?की ,

सुरांचे रंग चारही बाजूने चढवत ह्दयाचे ठोके चुकवणाऱ्या त्या *संगीताचा* ?की ,

भावनांचे रंग एकत्र करून दिलखुलासपणे त्यांना बोलतं करणाऱ्या *लेखक* / *लेखिकेचा?* की ,

 तीच कलाकृती व्यक्त करत तिला अक्षरशः घडवणाऱ्या *दिग्दर्शकाचा* ?

रंग *चेहऱ्यावरचे* , रंग त्या *प्रकाशाचे* , रंग त्या जादूमय *सुरांचे* , रंग त्या *शब्दांचे* आणि त्या *भावनांचे* .......

रंग ....

 *आयुष्य* नावाच्या *रंगभूमीवर* प्रत्येक प्रवेशात साकारलेल्या या सर्व कलाकारांचे ....

प्रत्येक दिवशी वेगळी भूमिका जगणाऱ्या आणि ते पात्र सजवणाऱ्या त्या सर्व *खऱ्याखुऱ्या* *अभिनेत्यांचे* .....

घडवणाऱ्या *शब्दांचे* आणि भावणाऱ्या *शांततेचे* ....

 आणि हा मेसेज वाचताना *प्रत्यक्ष* रंगमंच सध्या खूप *मिस* करणाऱ्या तरीही तो जगणाऱ्या तुम्हा सर्व *कलारसिक मित्रांचे* ....

🎼  जागतिक रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...🖋️🌈🤖

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट