मनोवेधक १०
१ .घेतलेले मोठे निर्णय चुकले की शेवटपर्यंत त्या चुकीला न्याय देण्यासाठी जपली जाणारी वेदना म्हणजे संयम ....
२ .स्ट्रगल फकत सामान्यांसाठीच असतो .... श्रीमंतांपर्यंत पोचला की त्याचं अॅड्वेंचर आणि नशिबवानांपर्यंत त्याचं रुटीन होतं ...
३ .दिवसांनुसार फक्त वय वाढतं ..... अनुभवांनुसार जे वाढतं ते आयुष्य .
४ .शब्दांची गरज जिथे संपते तिथे अपेक्षांचा पराभव होतो आणि सुरु होतो मौनरूपी सत्याचा प्रवास ..
५ .येणारी प्रत्येक सकाळ आणि मावळणारी रात्र यातलं अंतर जर जाणवणं बंद झालं तर आपलं तारुण्य संपलं असंच समजावं ..
६ .केवळ वेदनेने वेढलेल आयुष्य जसं नीरस तसंच पूर्णकाळ फकत सुखी आयुष्य सुध्दा भ्रमनिरासच ..... म्हणूनच काही वेदना सुखांबरोबर आवर्जुन जपाव्यात
७ .डोळ्यांना दिसते आणि हृदयापर्यंत पोचते ती संवेदना ...
मेंदूपर्यंत पोचली की तीचं रूपांतर सत्यात होतं .
८ सत्य कधीही ओरडून सांगितलं तर पटत नाही ..
वेळ आणि शब्दांशिवायचा पेटलेला गोंधळ हीच सत्य जाणून घेण्याची माध्यमं ठरतात .
९ .पहाटेचा वासुदेव भर दुपारपर्यंत दिसू लागला ...
नीरव पहाटेचीच घनःश्याम सुंदरा ही अमर भूपाळी रात्रीच्या बेसूर शायरीमध्ये हरवू लागली ...
आणि मग आयुष्याचं रुपांतर लाईफ मध्ये झालं ..
१० . मन आणि बुद्धी यांच्यात नक्कीत सामंजस्य आहे ...
कारण मनाला न पटणाऱ्या भावनांच रुपांतर बुद्धी व्यवहारात करते आणि बुद्धीला न पेलणारे व्यवहार मनात भावनांच रुप घेतात ..



Khup chaan dada
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाKhup chhan 👌👌👌
उत्तर द्याहटवाkhup mast
उत्तर द्याहटवामस्तच
उत्तर द्याहटवाVery useful in life
उत्तर द्याहटवाVery useful in life
उत्तर द्याहटवा