मनोवेधक १०




१ .घेतलेले मोठे निर्णय चुकले की शेवटपर्यंत त्या चुकीला न्याय देण्यासाठी जपली जाणारी वेदना म्हणजे संयम ....

 २ .स्ट्रगल फकत सामान्यांसाठीच असतो .... श्रीमंतांपर्यंत पोचला की त्याचं अॅड्वेंचर  आणि नशिबवानांपर्यंत त्याचं रुटीन होतं ...

३ .दिवसांनुसार फक्त वय वाढतं ..... अनुभवांनुसार जे वाढतं ते आयुष्य .

४ .शब्दांची गरज जिथे संपते तिथे अपेक्षांचा पराभव होतो आणि सुरु होतो  मौनरूपी सत्याचा प्रवास ..

५ .येणारी प्रत्येक सकाळ आणि मावळणारी रात्र यातलं अंतर जर जाणवणं बंद झालं तर  आपलं तारुण्य संपलं असंच समजावं ..

 ६ .केवळ वेदनेने वेढलेल आयुष्य जसं नीरस तसंच पूर्णकाळ फकत सुखी आयुष्य सुध्दा भ्रमनिरासच ..... म्हणूनच काही वेदना सुखांबरोबर आवर्जुन जपाव्यात

७ .डोळ्यांना दिसते आणि हृदयापर्यंत पोचते ती संवेदना ...

 मेंदूपर्यंत पोचली की तीचं रूपांतर सत्यात होतं .

 ८ सत्य कधीही ओरडून सांगितलं तर पटत नाही ..

 वेळ आणि शब्दांशिवायचा पेटलेला गोंधळ हीच सत्य जाणून घेण्याची माध्यमं ठरतात .

 ९ .पहाटेचा वासुदेव भर दुपारपर्यंत दिसू लागला ...

  नीरव पहाटेचीच घनःश्याम सुंदरा ही अमर भूपाळी रात्रीच्या बेसूर शायरीमध्ये हरवू लागली ...

 आणि मग आयुष्याचं रुपांतर लाईफ मध्ये झालं ..

१० . मन आणि बुद्धी यांच्यात नक्कीत सामंजस्य आहे ...

 कारण मनाला न पटणाऱ्या भावनांच रुपांतर बुद्धी व्यवहारात करते आणि बुद्धीला न पेलणारे व्यवहार मनात भावनांच रुप घेतात ..


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट