रोहितची गोष्ट
आज खूप दिवसानंतर त्याला सकाळची निवांत झोप लागली. पहाटेची वेळ सरून सकाळ डोकावत होती. गजरच घड्याळ पण आज निपचित पडलं होतं. बराच वेळ कुशी बदलल्यावर तो उठून जागेवरच खूप वेळ झोपेच्याच तंद्रीत बसला. दाराखालून वर्तमानपत्र आत आलं. हात लांब करून त्याने वर्तमानपत्र वाचायला घेतलं. हेडलाईन्स मध्ये भारताची चांद्रयान मोहीम , निवडणुकांचे निकाल आणि भारताचा ऑस्ट्रेलिया वरील दणदणीत विजय या बातम्या झळाळत होत्या . सोबतच नवीन वर्षाची हॅपी न्यू इयर ची शुभेच्छा देणारी एक वेगळीच पुरवणी होती. वर्तमानपत्र बाजूला ठेऊन तो पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेला. दोन घोट पाणी पिल्यानंतर अचानक त्याची तंद्री खुलली आणि शॉक लागल्यासारखा तो बाहेर हॉल मध्ये पळत आला. पेपर हातात घेतला --
सोमवार दि. १ जानेवारी . घड्याळाकडे लक्ष गेलं . नऊ वाजून गेले होते. सगळ्या गोष्टी तशाच सोडून तो बाथरूम मध्ये पळाला. कसबसं आवरून पंधरा मिनटांमध्येच बाहेर पडला . गाडीला किक मारून तो निघणार तेवढ्यात गज्याकाकाचा आवाज आला ,"आज कुठे बाहेर वाटतं ?"
रोहित -" अरे काका आज खूप उशीर झालाय कामावर जायला. परत आलो कि बोलतो "
गज्याकाका " पण आज रविवारी सुट्टीच्या दिवशी पण ऑफिस आहे का ? कामाचा व्याप वाढतोय वाटतं तुझा "
रोहित गोंधळला .त्याने घाई घाई मध्ये त्याचा मोबाईल काढला . त्यावर तारीख होती ३१ डिसेंबर , रविवार २०१८. सोबत कार्तिक चे मिस कॉल ..रोहित कोड्यात पडला .तसाच घाई घाई मध्ये तो घरी आला. शूज न काढताच त्याने वर्तमानपत्र हातात घेतलं. त्यावर तारीख होती १ जानेवारी २०१८ , सोमवार . कोणीतरी आपली चेष्टा करतय असं त्याला वाटलं . थोड्या रागाच्या भरात त्याने शूज काढले. फ्रेश होऊन चहा ठेवला. त्याच्या मनातून काही तो विषय जात नव्हता. अशी चेष्टा कोण करेल माझी ? या विचारात त्याने टीव्ही ऑन केला.
" भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यात , निवडणुकांची मतमोजणी सुरु , आज भारताचा ऑस्ट्रेलिया बरोबर अंतिम सामना " - अशा हेडलाईन्स झळकत होत्या . आता मात्र रोहित ला पुरता घाम सुटला . परत तो ते वर्तमानपत्र घेऊन वाचायला लागला. ज्या ज्या बातम्या छापल्या होत्या त्या सगळ्या एक दिवसानंतर च्या होत्या. आता मात्र रोहित ला झालेला प्रकार हळू हळू लक्षात येऊ लागला . मोबाईल हातात घेतला आणि कार्तिक चा नंबर डायल केला लगेच कट केला.
" कोणाला कसा विश्वास बसेल... सगळे मला वेडा समजतील." त्याच्या मनात विचारांची गर्दी होऊ लागली.
" आणि ..... आणि जर हे खरंच असेल तर मी हे कोणाला का सांगावं ? मी ह्याचा उपयोग करून घेणार. हो.... हो. मी या भविष्याच्या जोरावर वर्तमानाला जिंकणार... येस . "
त्याने त्याची डायरी आणि पेन काढले .वर्तमानपत्रावरील वेगवेगळ्या नोंदी करून घेण्यात तो व्यस्त झाला . बघता बघता रोहितची डायरी पूर्ण नोंदींमध्ये भरून गेली. रोहितच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास उमटू लागला. त्याच्या डोक्यात विचारांची चक्र घुमू लागली. उत्साहात त्याने कार्तीकला फोन लावला आणि ३१स्ट च्या पार्टीची पूर्ण प्लांनिंग करण्यात तो गुंग झाला.
रात्री संपूर्ण
जग नवीन वर्षाचं स्वागत करत असताना रोहित मात्र एका वर्तमानपत्राची वाट बघत होता.पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर रोहित सकाळी दरवाजाजवळच बसून राहिला. जरावेळाने तो जादूई वर्तमानपत्र
दरवाजाखालून आत आला. रोहित
त्याची डायरी आणि वर्तमानपत्र घेऊन तास न तास नोंदी
करू लागला . एरवी ऑफिसचं काम घरी कायम घेऊन तास न तास बसणारा
रोहित ऑफिसच्या फोनकडे पण लक्ष्य देत
नव्हता. हळूहळू रोहितचा दिनक्रम बदलू लागला. तो लॉटरीची तिकीट
विकत घेऊन मोठी मोठी बक्षीस जिंकू लागला. क्रिकेट आणि फुटबॉलचे मोठे मोठे सट्टे जिंकू लागला. मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार
करू लागला. सगळं काही खूप आलबेल चालू होत. पण रोहित पूर्ण निर्ढावत चालला होता. त्याच्या
आयुष्यातील धावपळ, उत्कंठा आणि आव्हान सगळे संपत चालले होते. पण साचत चाललेल्या ऐषारामामुळे
तो असंवेदनशील झाला होता. त्याची भाकीत खरी होऊ लागली आणि त्याने भविष्य सांगण्याचा
व्यवसाय पण सुरु केला.
एक दिवस घडलं वेगळंच . डायरीमध्ये नोंदी लिहून घेताना
त्याच लक्ष अचानक भावपूर्ण श्रध्दांजली या सदराकडे गेलं. आणि त्याच्या काळजात धस्स
झालं. भावपूर्ण श्रध्दांजली या रकान्यात त्याच नाव आणि फोटो होता . रोहितच्या डोक्यात
विचारांचा काहूर माजला . त्याला काहीच सुचेनासं झालं. मागील पूर्ण आयुष्याचा धावता
चित्रपट त्याच्या डोळ्यासमोरून धावू लागला. पुर्वीच ते स्वच्छंदी आयुष्य , स्ट्रगल
पिरिअड मध्ये मिळालेले प्रमोशन्स , दिवस आणि
रात्र यांचं जुळलेलं आनंदी आयुष्य आणि उद्या काय ? या उत्कंठेने उगवणारी नवीन पहाट
.....
"भविष्याला
वर्तमानावर वरचढ करून मी माझा काळच कापून टाकला
इतका कि या सगळ्यांमध्ये आयुष्याला तिलांजली देऊन आज मृत्युसमोर मी उभा आहे."
- रोहीत चे विचार थांबायला तयार नव्हते आज.
भीती आणि
घृणा दोन्ही एकाच वेळी आ वासून उभ्या होत्या.आयुष्यातला शेवटचा दिवस म्हणून त्याने
घरी आणि सगळ्या मित्रांना फोन केले. झालेली चूक लक्षात आली पण त्याची एवढी मोठी किंमत
चुकवावी लागेल यावर अजून रोहित चा विश्वास बसत नव्हता. घरी राहून मृत्यूला टाळता येईल
का ? या भाबड्या भावनेमध्ये त्याच्या अविरत विचाराना धास्तावलेल्या श्वासांची साथ मिळत
होती.खूप दिवसांची साठलेली झोप आणि माहित असलेल्या भविष्याची अनिश्चितता यामध्ये रोहितला
गाढ झोप लागली.
डोळे जेव्हा उघडले तेव्हा पूर्ण सकाळ झाली होती आणि दरवाज्याखालून हळूच पेपर आत आला. रोहित खडबडून जागा झाला. आपण जिवंत आहोत यावर त्याचा विश्वास बसेना. त्याने तोंडावर पाणी मारले आणि घटकाभर शांत बसला . थोडा शांत झाल्यावर आपल्या मृत्यूचं रहस्य जाणून घेण्यासाठी पेपर उलगडला. कोपऱ्यातल्या एका सदरात त्याच लक्ष गेलं . तिथे एक माफीनामा छापला होता. त्यात रोहितच नाव आणि चित्र होत आणि खाली लिहिलं होत ..
क्षमस्व .... सदर फोटो वाढदिवसाच्या शुभेच्छा या रकान्यात प्रसिध्द्व करण्याऐवजी भावपूर्ण श्रध्दांजली मध्ये चुकून छापला गेला. त्यामुळे मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करत आहोत .
देवाला नमस्कार करून रोहितने तो पेपर तसाच परत बाहेर ढकलला. त्यानंतर रोहितच्या घरात तो भविष्याचा पेपर कधीच आला नाही....
" भविष्य पाहायचं नसत. ते घडवायचं असत. आयुष्यात सस्पेन्स हवाच , थ्रिल पाहिजेच , उत्तुंग आकाशात भरारी घेण्याची धमक हवी. आज आणि आजच मधुर संगीत अक्षरशः अनुभयला हवं. आजचा क्षण खऱ्या अर्थाने जगावा अगदी मनमुरादपणे . " हे रोहितला पूर्ण समजलं होत .त्याच्या वाढदिवसाची त्याला खूप मोठी भेट आज मिळाली होती.
भविष्याच ते वर्तमानपत्र मात्र अजूनही फिरतंय असे कित्येक रोहित शोधत ....
बघा, तुमच्या वर्तमानपत्रातल्या तारखेत तुम्हाला सापडेल कधीतरी ...
तेव्हा मात्र ही रोहित ची गोष्ट कधी विसरू नका.....



Beautiful 👌
उत्तर द्याहटवा🙏
हटवाछान !!!
उत्तर द्याहटवा👌
🙏
हटवा👍👍
उत्तर द्याहटवा🙏
हटवा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌बापरे, प्रताप जबरदस्त लिखाण केलंय मित्रा. कथेचा सार माणसाला जमिनीवर आणुन सोडतो. माणसाच्या आयुष्यात आवाहनं असतात, म्हणुनच माणूस व्यवस्थित जगु शकतो.... बेस्ट ... भविष्यात चांगला लेखक म्हणून नाव कमावलं तर आश्र्चर्य नाही वाटणार
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you very much sir
हटवाWow
उत्तर द्याहटवा🙏
हटवाखूपच सुंदर प्रताप...तुझी कल्पना शक्ती खूपच सुंदर आहे...पण त्यात जगण्याचे मर्म सुंदर पणे आणि आशावादी नजरेने पेरले आहे... कारण मानवी जीवनांत यांची नितांत गरज असते...पैसा माध्यम आहे साध्य नाही..हे विसरून नाही चालत याची जाणीव होते ह्या कथेमुळे👍👍👍
उत्तर द्याहटवाThank you very much....🙏🙏🙏
हटवामी मोहिनी भोसले...
उत्तर द्याहटवाPratap proud of you
Thank you Aatu..🙏
हटवा. अतिसुंदर प्रताप
उत्तर द्याहटवा🙏🙏
उत्तर द्याहटवाKhoop chhan
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाखूप छान जमलेय ही फँटसी कथा तुम्हाला मस्तच👌👍
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवा