PAUSE
काल सहजच एका लहानग्याला *प्रश्न* पडला " माझी शाळा कधी सुरु होणार ?"...... प्रश्न *सहज* होता पण उत्तर तेवढच अवघड. काही उत्तरांमुळे हजारो प्रश्न जन्माला येतात आणि मग त्याची लाखो उत्तरं ...
हा *प्रवास* न संपणाराच ......
ट्रेन किवा बसचं तिकिट काढून तासनतास वेटिंग रूममध्ये *वाट* पाहणाऱ्या प्रवाशांसारख सध्याचं आयुष्य झालंय ....
घडयाळ्यातल्या सेकंद काट्यावरचं *नियोजन* तास काटयावर आलंय...
नविन लग्न झालेल्या नवरीला माहेरी जाण्याची जशी *ओढ* तशीच या परतीच्या प्रवासाची *आस* .....
इंग्रजीमध्ये खूप छान शब्द आहे ... *पॉझ* . तात्पुरतं थांबणं .
या पॉझमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक कामं केली जातात. सगळं ट्यून झालं की *रिफ्रेश* होऊन प्ले च बटण दाबलं की .... मधुर *संगीत* सुरु होतं .
मित्रांनो हा *लॉक डाऊन* सुद्धा एक *पॉझ* आहे .... *आयुष्य* नावाच्या गाण्याचा. हीच वेळ आहे दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज होण्याची.
कर्णाच्या कवचकुंडलांप्रमाणे मनाला *सकारात्मकतेच* चिलखत घालण्याची .....
मागचं *रिवाइंड* करुन ऐकण्याची आणि पुढचा *ताल* निवडण्याची ...
बराच वेळ न वापरलेले *टॉप गिअर* टाकून *वेग* साधण्याची....
भावनारूपी रथाला सारथी म्हणून *संयम* आणि *शांततेला* निवडण्याची...
खांद्यावर आपुलकीचे हात ठेऊ शकत नसलो तरी शब्दांच्या छत्रात *आधार* देण्याची ......
आणि ....
*श्वासांची* ही अविरत शर्यत सुरु ठेवण्यासाठी कोणाचा तरी *ऑक्सिजन* होण्याची ....
या वेळेतल्या एका उगवत्या दिवसाच्या *शुभेच्छांची* ...🙏🏻🎼🌞


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा