उपचार
कोणताही सण असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, मन्या काका
कायम सर्वात पुढे .गावामध्ये सुखदुःखाचे सगळे क्षण मन्या काकाअक्षरश:सर्वांबरोबर अनुभवायचा .कोण्या लहानग्याला
अभ्यासाची चिंता तर कोण्या दुकानदाराला त्याच्या व्यवसायाची चिंता! कोणाला प्रकृतीची चिंता तर कोणाला लांब राहणाऱ्या अमेरिकेतील मुलामुलींची . मन्या काका या सगळ्या चिंता हळूवार फुंकरायचा. मन्या काका म्हणजे मनावरचं दडपण हलक करणारउपचार औषधच जणू ....
रिटायर्ड होऊन मन्या काकाला पाच वर्ष झाली .या पाच वर्षांमध्ये मन्या काका आजूबाजूच्या लोकांमध्ये अजूनच एकरूप झाला. मन्या काकाने जरी बँकेतील पिउून ची नोकरी केली असली तरी मन्या काकाचं माणसांचं नेटवर्क एखाद्या मॅनेजर पेक्षा जास्त होतं .बँकेमध्ये कोणी आलं तर त्याचा सगळा प्रॉब्लेम मन्या काका फुकट विकत घ्यायचा .बँकेतून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती मन्याकाकाशी एक वेगळं नातं गुंफून जायची .मन्या काकाच्या ऑफिसची वेळ रात्री दहापर्यंत असायची. अगदी कोणाच्या घरी जाऊनही मन्या काका त्याचा अर्ज अगदी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढत .बँकेमध्ये अर्ज केल्यानंतर त्याला लागणारे बॉंड पेपर ,नोटरी, एफिडेविट सगळं मन्या काका ची जबाबदारी असायची .गावामधले मनिऑर्डर मन्या काकाला तोंडपाठ होते .काका चा पूर्ण पगार क्वचितच घरी जात असे .घरी कटकट होणं स्वाभाविकच ....
पण मन्या काकाच्या तोंडावरच हसू कधीच विरळ झालं नाही .रिटायर्ड झाला तेव्हा मन्या काकाच्या कार्यक्रमाला एखाद्या जंगी लग्नालाही जमणार नाही एवढी प्रचंड गर्दी जमली होती. रिटायर्ड झाल्यावर शांत बसतोय तो मन्या काका कसला ? नंतर मन्या काकानं एक रिक्षा विकत घेतली .पहाटे पाचलाच घरातून बाहेर पडणारा मन्या काका रात्री नऊ वाजता अत्यंत ताज्यातवान्या मूडमध्ये घरी येत असे .
एक दिवस सगळं अचानक बदललं .मन्या काकाचा मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं .प्रयत्नांची शर्थ झाली पण या नवीन आजारामुळे त्यांच्या मुलाचा निभाव लागला नाही. मुलगा गेला .मन्या काका खूप रडला. त्याची स्वप्न त्याने त्याच्या नातवंडं मध्ये जिवंत ठेवली. या नवीन आजारामुळे लॉक डाऊन लागू झालं आणि मन्या काकाची रिक्षा बंद झाली. काकानं या काळातही खूप जणांना आधार दिला .दिवसांमागून दिवस गेले. अंगणातल्या व्हरांड्यात मन्या काका रोज रेडिओवरील जुनी गाणी ऐकायचा आणि गुणगुणायला. आता हळूहळू ती बंद होऊन तिथे एक भयान शांतता निर्माण झाली. कधीच कसल्याच ताणतणावात आणि चिंतेमध्ये न दिसणारा मन्या काकाचा चेहरा आता थकल्यासारखा वाटू लागला .घरामध्ये स्वयंपाक घरातलं अपूर्ण किराणामाल आणि थकलेली बिल याबरोबर एकटेपणा मन्या काकाला खाऊ लागला .कोणत्याही चिंतेचं पूर्ण अपहरण करणारा मन्या काका आता निशब्द होऊ लागला. रात्री आकाशातील तारे निहाळत काका त्याच्या मनातील प्रश्नांची उत्तर शोधू लागला .खूप जवळची मित्रमंडळी या आजारामुळे गेली .ते काकाच्या जिव्हारी लागलं.
एक दिवस असंच काहीच विपरीत घडलं आणि मन्या काका पॉझिटिव आला .मन्या काका म्हणजे कित्येकांच्या मनाची मोकळीक ...कित्येकांचा विश्वास. कित्येकांच्या गालावरचा हसू ...मन्या काका ऍडमिट झाला आणि पूर्ण 14 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आला .आता मात्र मन्या काका पूर्वीप्रमाणेच हसायचा ,जास्त बोलायचा.... या बदलाचं रहस्य कळालं नाही म्हणून आज त्याला विचारलं तर त्यानं खूप सुंदर उत्तर दिलं .
"हे बघ, लॉकडाउन लागू झालं .एकटेपणा आला. त्यामुळे थोडं नैराश्य पण . कोरोना झाला .मग हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .तिथे बरेच समदुःखी भेटले .एका संध्याकाळी मला नातवंडाचा फोन आला. ती म्हणाली ,आजोबा तुम्हाला कोरोना कसा काय झाला ?तुम्हीच तर सांगितलं होतं की मन भरून हसणाऱ्या माणसाला असले आजार कधीच होत नाहीत.... या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो आणि पूर्ण कायापालट झाला .आज पर्यंत मी ज्यांना विश्वास दिला, ज्यांना शब्द दिले ,ज्यांना संकटांशी दोन हात करायचे सल्ले दिले हे सगळं खोटं होतं का ?कोरोना मला झालाय ..मी आज कमजोर झालो ,असं मला वाटत होतं पण विश्वासा पोटी मी दिलेले शब्द, दिलासे , आपलेपणानं जवळच्या सगळ्यांना दिलेली हिम्मत ...हीच कमजोर झाली ही वस्तुस्थिती होती .
त्या क्षणापासून या विश्वासाला, या हिमतीला तडा जाऊन द्यायचा नाही ,हे मी ठरवलं. काहीही झालं तरी कायम हसत राहायचं आणि ज्या प्रवासाच्या जोरावर इथपर्यंत आलो आहे तोच प्रवास पुढे अविरत चालू ठेवायचा मी ठरवलं ...कोणत्याही आजाराशी लढायचं म्हटलं तर शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचारही हवेच. हॉस्पिटलमधील ट्रीटमेंट मुळे शरीर रिकवर होतं तसंच या सगळ्या विश्वास आणि आधारामुळे मनातील चैतन्य निरोगी होतं .
शरीरावरील उपचार करण्यासाठी भरपूर दवाखाने हॉस्पिटल्स, सेंटर्स डॉक्टर्स, नर्सेस आहेत पण मनावर उपचार करण्यासाठी मन्या काका सारखे पिउून किवा रिक्षा ड्रायव्हर यांची खरी गरज आज आहे.
नाही का ?



प्रताप खुप छान लिहीतोय , लिहीत रहा ...
उत्तर द्याहटवाThanks sir ...nakkich
हटवाMast Pratap ;Manya kaka ; Real fact & positive Happy thoughts needed in current situations.
उत्तर द्याहटवाThank you
हटवाछान वाटलं वाचून प्रताप
उत्तर द्याहटवाThank you
हटवाKhup chan sir
उत्तर द्याहटवाThanks saheb..🙏
हटवाMast
उत्तर द्याहटवाThanks
हटवाMst Guru....1 नंबर...
उत्तर द्याहटवाThank you boss
हटवाBadhiyaa 👍
उत्तर द्याहटवाखूपच छान. प्रेरणादायी.
उत्तर द्याहटवातुझ्या नवीन उपक्रमाला शुभेच्छा.
खूप छान लिहिता सर तुम्ही।।असेच लिहीत रहा।।आता मन्या काका सारखेच जीवन जगणे आवश्यक झाले आहे,...
उत्तर द्याहटवाThanks madam 🙏🙏
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवा🙏
हटवा