मोकळीक .

मोकळीक 

एकदा आईच्या ड्ब्यातून  मी पन्नास पैसे घेतले न विचारता सायकल भाड्यानं फिरवण्यासाठी ....
 मी चोरी केली हे मला माहित होतं. आईला सुध्दा माहित होतं. पण त्यानंतरची माझ्या डोळ्यातली अपराधीपणाची भावना फक्त तीच वाचू शकत होती.  केलेली चुक संभाळून घेणं हे जिवंत नात्याचं पहिलं उदाहरण. ती तर आई आहे. 
 तिच्या वागण्यातून कुठेही दिसलं नाही ती माझ्यावर चिडलीय .... तिची माफी न मागता मला मिळाली होती . कारण त्या माफीमागे तिचा विश्वास होता. 
 संवाद नसतानाही नात्यांमधील मोकळीक .... ही अशी. 
  न राहवून मी एकदा आईची माफी मागितली. 
 आई म्हणाली " तुझं हे प्रायश्चित्त हीच तुझी शिक्षा आणि हीच माफी. 
 जिथे विश्वास आणि आपुलकी असते, तिथे संवाद नसतानाही ही मोकळीक जपली जाते "
  ही वाक्य मला तिची संवादातील मोकळीक शिवून गेली ... 
  •  

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट