श्रध्दांजली
ते हिशोब कधीच नाही लागले ....
देवाला दक्षिणेत टाकलेले पैसे आणि त्याने दिलेले आशिर्वाद ,
कोणाला बोललेले तिखट शब्द आणि त्यांच गोड हसू ,
एक संवादाची हाक आणि दुसरीकडे शब्दांवाचूनची शांतता,
मदतीसाठी एक आवाहन आणि हजारो मनांचं धावणं ,
समजुतीचा उदेश आणि त्याला गैरसमजुतीचं खलबत ,
लॉटरीचं तिकिट रुपयाच आणि बक्षीस लाखांचं,
हवेहवेशे सगळ्यांबरोबरचे एकत्र क्षण आणि एकटेपणातला स्वतःला उलगडवणारा प्रवास,
आनंदाचे मिळालेले सेकंद आणि वेदनेचे भोगलेले तास ,
आणि ... आणि ,
शंभर वर्ष जगलेलं जीवन आणि काही सेकंदांमधला मृत्यू ....
ज्येष्ठ महान साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना समर्पित


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा