एका योद्धयाची गोष्ट ..
काही ठिकाणं अशी असतात जिथे हात आपोआप जुळतात. मंदिराच्या पायऱ्यांवर , मशिदीच्या जिन्यांवर, चर्चच्या गेटवर , गौतम बुद्धांच्या पाऊलखुणांवर नतमस्तक होतो आपण ........ अशीच काही चारित्र्य, काही पर्व जिथे प्रत्यक्ष काळही नतमस्तक झाला आणि या युगपुरुषांची नावं इतिहासावर आजन्म कोरली गेली. यापैकी एक नाव - छत्रपती संभाजी महाराज. कित्येक वादग्रस्त लिखाणं आणि बिनबुडाचे आरोप अशा महापुरुषांवर झाली तरी त्यांची उंची वाढतच जाते कारण सत्य अमर असतं .......... चला तर मग मित्रांनो .....या युवराज छत्रपतींच स्मरण त्यांच्या जयंतीनिमित्त या लेखातून आपण करून घेऊ .....
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।
ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।
त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।
- कवी कलश
अर्थ:
यवनरुपी रावणाच्या (औरंगजेब) सभेत बजरंगाप्रमाणेच संभाजीराजांनाही बंधनात आणण्यात आले आहे. रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले संभाजीचे अंग शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणेच दिसत आहे. आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात तदत हे शंभुराजा..........तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तरस्ताचा त्याग केला आहे.
संभाजी राजेंचे बालपण
संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजी राजेंवर अपार प्रेम होते. नशीबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले.
नवव्या वर्षी आग्रा मोहीम
चौदाव्या वर्षी बुधभूषण
कुशल संघटक
अजिंक्य संभाजी राजे
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्याजोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता..
बुऱ्हाणपूर आणि रामशेज
उदार धार्मिक लोकनीति

छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. तसेच मौनी गोसावी, गणीराम, वासुदेव गोसावी, कऱ्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट, कऱ्हाडचेच शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या व्यवस्था लावल्या. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इ. देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे, यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत, हे तत्कालीन पत्रव्यवहारांतून दिसते.
हौतात्म्यामुळे अजरामर झालेले पराक्रमी पुरूष
१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.










शतश नमन 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा🙏
हटवाशम्भू महाराज की जय
उत्तर द्याहटवा🙏
हटवाखूप सुंदर लिहिलंय.. शतशः नमन!!
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवा🙏
हटवा